सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी सामुहिक विवाह सोहळा प्रसंगी केले


*गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवार संस्था, नागपूर यांचे सयुक्त विद्यमाने*
*१२७ आदिवासी युवक-युवतींचा सामूहिक विवाह सोहळा,*
-----------------------------------------------

दिं. २६ मार्च २०२३

गडचिरोली: पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली व मैत्री परिवार संस्था, नागपूर (गडचिरोली शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने अभूतपूर्व १२७ आदिवासी युवक- युवतींचा सामूहिक विवाह सोहळा अभिनव अभिनव लॉन चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पार पडला.

अभूतपूर्व सामूहिक विवाह सोहळ्याच्या प्रसंगी अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करतांना सामूहिक विवाह सोहळा म्हणजे आदिवासी समाजाचा मजबूत पाया तयार करणे आहे.सामूहिक विवाह सोहळ्यातून फिजूल खर्चापासून सुटका होते.
 सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजात सामाजिकता ऐकता मिळत असते. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि आत्मसर्पत नक्षलवादी युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या तसेच, नागरिकांच्या मनातील भय दूर करून त्यांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी पोलीस विभाग सातत्याने प्रयत्न करित आहे.त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.त्यामुळे या सामुहिक विवाह सोहळा च्या माध्यमातून , पोलीस दलाचे व मैत्री परिवार संस्थेचे सुद्धा मनापासून धन्यवाद ! 
सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांनी एकत्र यावे.याकरिता सामुहिक विवाह सोहळा महत्त्व आहे
आणि सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी सामुहिक विवाह सोहळा प्रसंगी करून नवं दाम्पत्यांना शुभ आशीर्वाद व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम. डॉ देवरावजी होळी, आम. कृष्णाजी गजबे,पोलिस विभागाचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ संदीप पाटील, आयुक्त राजकमल,जेष्ठ नेते तथा सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड़डीवार, डॉक्टर कुंभारे साहेब भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजयजी भेंडे, सचिव प्रमोद पेंढके, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोतपल सर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिलडा व मैत्री संस्थेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते   या सामूहिक विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील १२७ आदिवासी समाजातील युवक युवतींचा व ८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दाम्पत्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.