चाराण्याचा रस्ता,बाराणा कमीशन!



जळगाव शहरातील रस्ते मागील दहा वर्षात बनवले नाहीत.आणि आता महानगरपालिका निवडणूक जवळ आली म्हणून थातूरमातूर रस्ते बनवत आहेत.एकतर रस्ते दाखवता येतील आणि दुसरे रस्ते कामातून मिळालेले कमीशन निवडणूक कामी वापरता येतील.चार आणाचा रस्ता आणि बाराणा कमीशन.म्हणून घाईघाईने रस्ते बनवण्याचे प्रयत्न होत आहेत.
     असे रस्ते आम्ही जळगाव जागृत जनमंच ने प्रभाग १२,१,८ ,१९मधे शोधले.तेथेच बोंब ठोकली.चोरांनी रस्ते चोरले हो!पैकी काही नगरसेवकांनी मक्तेदारांना विनंती केली कि, आमच्या अब्रूचा सवाल आहे.तर रस्त्यावर आणखी एक थर चढवा.तेंव्हा मक्तेदार म्हणतात कि, तुम्हाला आणि साहेबाला दिलेले कमीशन परत करा.अशा कोंडीत नगरसेवक सापडलेले आहेत.
       नागरिक बांधवांनो,हे रस्ते काही नगरसेवक किंवा आमदाराच्या खाजगी पैशातून बनवत नाहीत.हा निधी आपल्याच करातून जमा झालेला आहे.तर मग, रस्ते चांगले बनवले कि नाही,हे पाहाणे आपली जबाबदारी आहे.ती जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत.इतर उच्चशिक्षित नागरिक यात लक्ष घालत नाहीत.ते काहीतरी कारणे नगरसेवक व आमदाराला घाबरून असतात.आमची जागृत जनमंच ची टिम मात्र सरळ रस्त्यावर उतरून बोंब ठोकतो.चोर चोर ओरडतो.तेंव्हा काही नागरिक किंचीत भयमुक्त होऊन आमच्या सोबत येतात.तेच नागरिक सोशल मेडियावर प्रसार करतात.पेपर व इलेक्ट्रॉनिक मेडिया अजून सावध भुमिका घेत आहेत.ते कायमच सत्ता आणि मत्ता चे बाजूने काम करतात.
        नागरिकांनो,अशी बेधडक ,धाडसी, प्रामाणिक कामाची सुरुवात करतांना प्रस्थापित लोक व प्रसार माध्यमे मदत करीत नाहीत.उलट ते आमची पणती विझवण्याचा प्रयत्न करतात ‌आमची कुठे बारीकशी चुक सापडते का,यांची वाट पाहातात.तरीही ही आमची मोहीम चालू आहेच.
       तरीही यांची प्रसिद्धी जळगाव शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रात होतच आहे.इतर शहरातील ,इतर तालुक्यातील ,इतर जिल्ह्यातील पत्रकार आम्हाला , आमच्या कामाला प्रसिद्धी देत आहेत.ही आमच्या जमेची बाजू आहे.
       नागरिकांनो,आपल्या गल्लीत, कॉलनीत ,वार्डात, प्रभागात जर असे रस्ते बनले नाहीत, किंवा कंडेम बनवलेत तर आम्हाला फोनवर कळवा.आम्ही येतोच.समस्या तेथे जनमंच.चोरी तेथे जनमंच.भ्रष्टाचार तेथे जनमंच.असे आमचे धोरण आहे.जळगांव बदलण्यासाठी अशी धाडसी,साहसी सुरूवात करणे आवश्यक आहे.
    खडसे, महाजन, गुलाबराव ही मंडळी सत्तेत चूर आहेत.यांना भ्रम आहे कि, आम्ही मतदारांना विकत घेऊ शकतो.इव्हीएम आमच्या ताब्यात आहे.तर मग, रस्ते न बनवता ही माणसे जलसा तमाशा ,नाच गाणे करण्यात दंग आहेत.खडसे , महाजन किंवा गुलाबराव ही माणसे ईश्वराने पाठवलेली नाहीत.ते देवदूत नाहीत.म्हणून जास्त वेळ त्यांच्यावर विसंबून राहू नका.यांनी दिलेला अनुभव अत्यंत वाईट आणि निराशाजनक आहे.उलट या माणसांनी नागरी सोयी सुधारणांचा निधी चोरलेला आहे.म्हणून तर यांची संपत्ती अचानक ,कमी वेळात अतिरिक्त वाढलेली आहे.ही कमावलेली नाही.चोरी केलेली आहे.आमच्या ताटातूनच.याची चीड जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आली पाहिजे.
     नागरिकांनो, तुम्ही घाबरत असाल तरी सुद्धा आम्हाला फोनवर कळवा.गुपचूप कळवा.पारोळा, एरंडोल, धरणगाव,पाचोराचे नागरीक व पत्रकार आम्हाला जळगावच्या या समस्या कळवतात.आजच पाचोरा चे वरिष्ठ पत्रकार श्री दिलीप जैन यांनी धाडस करून मेहरूण मधील बोगस रस्त्यांबाबत माहिती आम्हाला दिली आहे ‌.या मार्गाने कि असेना,हस्ते परहस्ते कि असेना,व्हाया व्हाया कि असेना ,आमच्याकडे कंडेम रस्ता बाबत माहिती दिली.आणि हे सुद्धा सांगितले कि, नगरसेवक हे नागरिकांना धमकी देत असल्याची ही माहिती दिली.
    अडल्या,नाडल्या,फसल्या गेलेल्या नागरिकांचे आम्ही नेतृत्व करीत आहोत.जागृत व्हा,जागृत करा.निर्भय व्हा, हक्कासाठी लढा.

.‌‌शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव