गडचिरोली: पोर्ला फॉक्टरी जवळ बसने एका इसमास चिरडले


गडचिरोली:-गडचिरोली वरुन १५ कि.मी. अतंरावरील पोर्ला फॉक्टरी जवळ बसने एका इसमास चिरडले त्यामुळे तो युवक जागीच ठार झाला. फॉक्टरी रहिवासी अर्जुन बारसागडे वय २५ हा युवक दि . १७ ला शुक्रवारी सांयकाळी ७ वाजता मोह झरी वरून येत होता एवढ्यात नागपूर वरून गडचिरोली कडे भरधाव वेगाने एस.टी. महामंडळाची बस येत होती. अचानक अर्जुन फॉक्टरी कडे जात असतांना अपघात घटला व बसच्या धडकेने अर्जुन जागीच ठार झाला. बघ्याची गर्दी झाली होती. गडचिरोली पोलिस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व प्रेत सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. गडचिरोली पोलीस अधिक तपास करीत आहे. सदर युवकाच्या अपघाती निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आले.