नागभीड : शेजाऱ्याने बैलबंडी मागितली म्हणून त्याच बंडीच्या उभारीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी देवपायली येथे घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण उरकुडा कोहपरे (७५) आणि गणेश पटवारू बोरघरे (३५) हे दोघे शेजारी आहेत. लक्ष्मण कोहपरे यांना शेतातील माल आणायचा असल्याने शेजारील गणेश बोरघरे यांना बैलबंडीची मागणी केली. याचा गणेशला राग आला. त्याने बैलबंडीची उभारी काढून लक्ष्मणच्या डोक्यावर मारली. यात त्यांना चांगलीच दुखापत झाली. लागलीच त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन पोलिसांत तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.