रेती तस्कराकडून आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी चक्क केली आपल्या ‘मामा’ ची नेमणूक


चंद्रपूर जिल्ह्यात गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असुन जिल्ह्यातील रेतिघाट भ्रष्टाचार व अवैध धंद्याचे केंद्र झाले आहे. रेतीचा अवैध उपसा करून तस्कर आपल्या तुंबड्या भारत असुन अल्पावधीतच कोट्यधीश झालेल्या तस्करांचे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासुन थेट खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत अर्थपुर्ण संबंध असल्याची चर्चा नेहमीच होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ह्यांनी तर गोंडपिपरी येथिल उपविभागीय अधिकारी आपल्या मामाच्या मदतीने रेती तस्करांशी विशिष्ट भ्रमणध्वनी क्रमांकावरून थेट सेटिंग करत असल्याचा सनसनाटी आरोप पत्रकार परिषदेत करून खळबळ उडवून दिली.

राष्ट्रवादी पक्षाच्या आरोपांनुसार गोंडपिपरी येथील उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत आहे, ह्यापूर्वी बल्लारपूर येथे कार्यरत असताना देखिल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले व यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी होऊनसुद्धा त्यांची कुठलीही चौकशी अथवा कारवाई न झाल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


उपविभागीय कार्यालयात कार्यालयीन कामाकाजासाठी सर्वसामान्य नागरिकांशी हे अधिकारी असभ्य वर्तन करतात. नागरिकांना शुल्लक कामासाठी अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने सर्वसामान्यांची कामे रखडली असून त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


ह्याशिवाय उपविभागीय अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असुन रेती तस्करांशी त्यांचे असलेले अर्थपुर्ण मधुर संबंध पर्यावरण तसेच शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. गोंडपिपरी तालुक्यात आजमितीस यनबोथला, कुलया, हिवरा, आर्वी ह्या चार रेती घाटाचे शासनाकडून लिलाव करण्यात आला आहे. या रेतीघाटातून शासनाने निर्धारित केलेल्या नियत क्षेत्रातून रेतीची उचल न करता, नियतक्षेत्रा बाहेरून सुध्दा फार मोठया प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन चालू आहे. उपविभागीय अधिकारी हे या रेती तस्करांशी संगनमत केले आहे. या घाटातून मोठ-मोठया हायवा (१६ चक्का ट्रक) द्वारे रात्रंदिवस ओवर लोड वाहतूक केली जात आहे. रेती तस्कराकडून आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या ‘मामा’ ची नेमणूक केली आहे. हे मामा आपल्या मोबाईल नंबर ९०९१११२७१६५ वरून वॉट्सॲप कॉलींग करून, रेती तस्करांशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी संपर्क करतात तसेच दस्तुरखुद उपविभागीय अधिकारी हे सुध्दा गौण खनिज माफियांना आपल्या स्वतःच्या ९७६७३३५५१९ या क्रमांकावरून वॉट्सॲप संदेश देतात. या दोन्ही नंबरचा सी.डी.आर. तपासल्यास उपविभागीय अधिकारी व तस्करांशी असलेल्या संबंधाचे बिंग फुटू शकतात व सदर रेती घाटाचे फेर मुल्यांकन करून, सदर अवैध क्षेत्राचे दंड आकारणी संबंधीत अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नियमाबाहय वाहतूक सुरू असताना एखाद्या अधिकारी वा कर्मचाऱ्याने कारवाई केल्यास उपविभागीय अधिकारी त्यांचेवर दबाव टाकून गाड्या सोडायला भाग पाडतात असाही आरोप केल्या जात आहे.


उपविभागीय अधिकारी ढवळे यांची विभागीय चौकशी केली तर, त्यांनी अवैध मार्गाने कमावलेली फार मोठी संपत्ती समोर येवू शकते. गतवर्षी एप्रिल २०२२ वढोली येथील तत्कालीन तलाठी श्री बलकी यांनी ग्रामसभेत संपूर्ण ग्राम पंचायत व ग्रामस्थांना अपमान केल्याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यासंबंध- तहसिलदाराकडे मागणी केली असता. तहसिलदारानी सदर फाईल एस.डी.एम. ढवळे यांच्याकळे सुपूर्द केली मात्र त्यांनी आजच्या तारखेपर्यंत सदर फाईल विभागीय चौकशी करता न पाहता स्वतःकडेच ठेवून घेतली त्यामुळे या विषयाची सुध्दा सखोल चौकशी करून, ८ दिवसातील सदर दोन्ही विषयांवर विभागीय चौकशी करून, दोषी उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, तसे न झाल्यास, ९ व्या दिवसापासून, आमरण उपोषण करण्यात येईल व उपोषणादरम्यान काही जिवीत हानी झाल्यास, सदरची जबाबदारी शासन म्हणून आपणावर राहील. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश वासुदेवराव कवठे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत कळविले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ह्यावेळी त्यांचेसह या वेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके,, राजेंश कवठे तालुका अध्यक्ष अरुण वनकर, अरुण बोरकर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.