महिलेच्या मारेकऱ्याला अटक
गुन्हे शाखेची कारवाई  आरोपीकडून खुनाची कबुलीगोंदिया, : सालेकसा ते आमगाव मार्गावरील पानगाव येथील तलावाच्या काठावर 35 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना 4 मार्च रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा येथील आरोपी लखनलाल मंगरू लिल्हारे (वय 39 ) याला अटक केली. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

4 मार्च रोजी पहाटे पानगाव ते सालेकसाकडे येणाऱ्या पानगाव तलावाच्या काठावर एका अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सालेकसा पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांनी पोलिस स्टाफसह घटनास्थळावर पोहोचून प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत वरिष्ठांना तत्काळ माहिती दिली. वरिष्ठांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत व प्रत्यक्ष पाहणी केली. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खून करणाऱ्या गुन्हेगाराचा तत्काळ शोध घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा करून गुन्हेगार आरोपीस तत्काळ अटक करण्याबाबत निर्देश देऊन वेगवेगळी पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसाचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिलेची ओळख पटवन

खून करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत होते. महिलेची ओळख पटल्यानंतर गुन्हेगाराचा शोध करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या व तांत्रिक माहितीच्या आधारावरून गुन्हेगाराचा शोध घेऊन खून करणारा आरोपी लखनलाल मंगरू लिल्हारे (वय 39, रा. परसवाडा) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीनेच खून केल्याची कबुली दिली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे करत आहेत.

खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत उलगडा करून आरोपीला तात्काळ अटक केल्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात विजय शिंदे, महेश विघ्ने, जीवन पाटील, वनिता सायकर, हवालदार विठ्ठल ठाकरे, चेतन पटले, इंद्रजीत बिसेन, तुलसीदास लुटे, दिक्षीत दमाहे, संतोष केदार, हंसराज भांडारकर, लक्ष्मण बंजार, मुरली पांडे यांनी केली.