*भाग्यश्री ताई आत्राम आणि हर्षवर्धन बाबा आत्राम यांची उपस्थिती*
दिनेश बनकर कार्यकारी संपादक
आलापल्ली:- संपूर्ण देशात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे.सायंकाळच्या सुमारास आलापल्ली शहरात शोभायात्रा काढण्यात आली. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शोभायात्रेत सहभागी होत श्रीरामाचे दर्शन घेतले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रात आलापल्ली हे शहर मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते.याठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे केले जातात.रामनवमी निमित्त रामभक्तांनी कालपासूनच शहरात तयारी केली होती.आज सकाळपासून विविध कार्यक्रम घेत सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढली. हाती भगवे ध्वज,भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक,युवती तसेच परिसरातील नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
शोभायात्रा वीर बाबूराव चौकात येताच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री आत्राम तसेच माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी शोभायात्रेत सहभागी होत श्रीरामाचे दर्शन घेतले.भाग्यश्री आत्राम यांनी विधिवत पूजा करत आरती केले.
ठिकठिकाणी आलापल्लीकरांनी या रॅली व शोभायात्रेचे स्वागत केले.राम मंदिरातून निघालेली शोभायात्रा विर बाबूराव चौक,बस स्टँड चौक,श्रीराम चौक आणि वि.दा. सावरकर चौक परत तिथेच समापन झाले.यावेळी डिजेच्या तालावर महिला, पुरुष,युवक,युवती एकच जल्लोष केले. तर,चिमुकल्यांनी सुद्धा लेझिम द्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले.विशेष म्हणजे आलापल्ली शहरात हजारो रमाभक्तांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा पार पडली.यावेळी शहरात आनंदमय आणि भक्तिमय वातावरण दिसून आले.