वाघाच्या हल्ल्यात भजन बारई ठार


चंद्रपूर : अष्टभुजा जंगल परिसरात लाकूड ताेडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, रविवारी सकाळी उघडकीस आली. भजन बारई असे मृताचे नाव आहे. भजन बारई शनिवारी लाकूड ताेडण्यासाठी जंगलात गेले होते. ते सायंकाळ झाल्यानंतरही घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा जंगल परिसरात शोधाशोध केली असता, एक पाय तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांचे शिर आढळून आले. वाघाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले होते त्यामुळे चेहरा विद्रुप झाला होता. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कारेकर यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.