रानडुक्कराचा बैलावर हल्ला



कारंजा :  रानडुक्कराने अचानकपणे बैलावर हल्ला चढविल्याने

बैल गंभीर जखमी झाल्याची घटना ३ मार्चला सकाळी साडे ७ वाजताच्या दरम्यान कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे शेतशिवारात घडली. या घटनेत बैल गंभीर जखमी झाल्याने मालकाचे जवळपास ७५ हजार रूपयांचे नुकसान झाले असुन वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अ मागणी पशुपालक पुरूषोत्तम खुशालराव लांडकर यांनी वनपरीक्षेत्र अधिकाछयांकडे तक्रारीतुन केली आहे.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराचा मुलगा अनिकेत लांडकर हा सकाळी बैल चारण्याकरीता शेतात गेला असता धुछयावरील झुडुपात दबा धरून बसलेल्या रानडुक्कराने बैलावर हल्ला चढविला यावेळी रानडुक्कराने बैलाच्या उजव्या पायाला चावा घेतल्याने बैल गंभीर जखमी झाला त्यामुळे तक्रारदाराचे जवळपास ७५ हजार रूपयाचे नुकसान झाले.त्यामुळे वनविभागाने नुकसान भरपाई देउन वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करावे असी मागणी लांडकर यांनी आपल्या तक्रारीतुन केली आहे.