गडचिरोल्ली;-रात्री वासाळा येथील झरकर हेआरमोरी वरून गडचिरोली कडे जात असतांना ठाणेगाव समोर रोडवर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. झरकर सर अपघातग्रस्त अवस्तेत रोडच्या बाजुला पडले असतांना त्यांना जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गाडी ने आरमोरी येथील रुग्नालयात भरती करून तत्परता दाखवली आणि त्यांच्या नातेवाईकांना व मित्र मंडळीना अपघाताची माहिती दिली.