अनैतिक देहव्यापारावर नागपूर (ग्रामीण) पोलिसांचा छापा


पारशिवनी-: – नयाकुंड येथील ड्रीमविला फॅमिली रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर नागपूर (ग्रामीण) पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षातील पथकाने गुरुवारी (दि. २३) दुपारी धाड टाकली. यात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र निकम यांनी दिली.


लाँज प्रबंधक सुनील चंद्रभान मेश्राम (४६, रा. गिरड रोड, बायपास, उमरेड) व मालीक शुभम कारेमोरे (३०, रा. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नयाकुंड येथील ड्रीमविला फॅमिली रेस्टॉरंटमध्ये अनैतिक देहव्यापार चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षातील पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे या कक्षातील कर्मचाऱ्यांनी आधी त्या रेस्टॉरंटची प्रत्यक्ष पाहणी केली. बनावट ग्राहक पाठवून आत चौकशी केली. त्या ग्राहकाने रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला शरीर संबंधा साठी तरुणीची मागणी केली. त्या दोघांचा सौदा पक्का होताच त्या ग्राहकाने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाला सूचना दिली आणि त्यांनी धाड टाकली.यात अनैतिक देह व्यापारा साठी तरुणींना प्रवृत्त करणाऱ्या आरोपी प्रबंधक सुनील चंद्रभान मेश्राम (४६, रा. गिरड रोड, बायपास, उमरेड) व लांज चे मालिक शुभम कारेमोरे (३०, रा. सावनेर) दोघांना अटक करण्यात आली. शिवाय, ते अनैतिक देहव्यापार करवून घेत असल्याचे ठोस पुरावे ही पोलिसां नी ताब्यात घेतले.

याप्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस हवालदार ज्योती वानखेडे यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी अपराध क्रमाक ८७/२३ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सहकलम ३, ४, ५, भादंवि ३७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही पोलिस निरिक्षक राहुल सोनवने करित आहे.

अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र निकम, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक मिरा मटाने, हवालदार उर्मिला हत्तीमारे, मालिनी मोहिते, प्रफुल्ल भातुलकर, नीलेश बरडे, आसिफ सय्यद यांच्या पथकाने केली.