मुलचेरा:-तालुक्यात बंगाली बांधव मोठ्या संख्येने असल्याने याठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.सध्या बासंती पूजा सुरू असून 27 मार्च ते 31 मार्च पर्यंत सदर उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जात आहे.बासंती पूजा निमित्त माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी विविध गावांत भेटी देऊन पूजा पाठ करत आशीर्वाद घेतले.
तालुक्यात दरवर्षीच बासंती पुजा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.27 मार्च रोजी शष्टी पुजा करून घटस्थपणा करण्यात आला.त्यानंतर सप्तमी,अष्टमी,नवमी आणि दशमी असे 31 मार्च पर्यंत पाच दिवस पूजापाठ करण्यात येणार आहे.यादरम्यान विविध ठिकाणी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ऑर्केस्ट्रा,नृत्य,बाबूल गांन अश्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.29 मार्च रोजी भाग्यश्रीताई आत्राम यांनी मथुरानागर,सुंदरनगर आणि गणेशनगर येथे सुरू असलेल्या बासंती पूजेत सहभागी होत देवीचे दर्शन घेतले तसेच सुरू असलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग घेतले.यावेळी कमिटी तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याठिकाणी दुर्गा पूजा,सरस्वती पूजा,बासंती पूजा,भागवत कथा,शितला माता पूजा,काली पूजा,विश्वकर्मा पूजा,आदी पूजा मोठ्या उत्साहात साजरे केले जातात हे विशेष.