महत्वाचे म्हणजे,ज्या गावात विकासाच्या नावावर कामे आणली जातात; त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घेणे आवश्यकच असतो.मात्र याला अपवाद म्हणून काही विकास कामे विना ग्रामपंचायतीच्या ठरावानुसारही आणली जातात. अशीच विना ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आणलेल्या विकास कामांच्या बाबतीत 'तुमच्या ग्रामपंचायतीचा यामध्ये काहीही संबंध नाही'.असे म्हणणे कितपत योग्य आहे. कामे कुठूनही आणा जसे, दिल्ली, मुंबई, कोलकाता व इतर ठिकाणांहून विकास काम करणे कुठे आहे; ज्या गावाचे वा ग्रामपंचायतीचे नाव पुढे केले आहे तिथेच ना? मग संबंधित ग्रामपंचयतीमध्ये त्याचा लेखाजोखा व इतरही माहिती असणे आवश्यक आहे.अन्यथा विकास कामांचे नाव पुढे करून गावात कुणीही कामे आणा आणि कसेही कामे करून; खिसे गरम करून, चालते बना. काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना माहितीची जाण नसते वा काहीजण माहिती असूनही माहीत नसल्याचे भासवित असल्याने 'चलता है चलने दो, खाता है उसको ओर खाणे दो' अशी अवस्था झाली आहे.