ठाणेदार संदिप मांडलिक यांचे स्वागत


आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांचे किटाळी येथिल कमांडो प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून स्थानांतरण झाले आहे. त्यांचे जागी याच कमांडो प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख पद सांभाळत असलेल्या संदिप मांडलिक यांची नियुक्ती झाली आहे. वैरागड ग्रामपंचायच्या वतीने उपसरपंच भाष्करराव बोडणे, सदस्य आदेश आकरे यांनी पोलिस स्टेशन आरमोरी येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.