बातमी जी आधी लागते ती जास्त पाहिली जाते.आता सोशल मेडिया खूप फास्ट झाला आहे.
आपण प्रयत्न करू,आपले काम आपली बातमी लोकांपर्यंत लवकर पोहोचवू.जशी आहे तशी पोहचवू.
आमच्या रोजच्या जगण्यात युद्ध प्रसंग असतो. आमदार आणि मंत्री च्या स्पर्धेत काम करणे तसेच प्रस्थापित पेपर व चैनल विरोधात पोर्टल चालवणे जिकीरीचे काम आहे.प्रस्थापितांच्या विरोधात ऊभे राहाणे खूप हिंमतीने आहे.जर आपण जास्त कष्ट केले व कौशल्य वापरले तर स्पर्धेत टिकू शकतो.
जे घडले ती बातमी असते.पण का घडले?कसे घडले?कोणी घडवले? परिणाम चांगला कि वाईट? याबाबत मत मांडले तर पेपर व चैनल पेक्षा तुम्ही नवोदित पोर्टल,यु ट्युब पुढे जाऊ शकतात.शिवाय सत्तेविरुद्ध आम्ही बोलतो तर त्याचा ही उहापोह केला तर पिडीत जनतेला जास्त आवडते.
जैन,खडसे, महाजन, गुलाबराव यांच्या शेणाला अगरबत्ती लावली, फोटो काढदा तर ती बातमी बनत नाही.पण शेण टाकतांना किंवा नंतर त्यांच्या चड्डीला चटका लावला,त्यांचे मागील कुरणे जळाले तर बातमी मजेदार बनते.
नवीन बातमीदारांनी, पत्रकारांनी हे तंत्र अवलंबले पाहिजे.गोद्री
येथे म्हटले पाहिजे कि, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी महाजन यांची होती.पण त्यांनी ढोपरले,वापरले,फडक्याला पुसून फेकले.हे चुकीचे आहे.तसे म्हणण्याची हिंमत शिवराम पाटील यांनी केली.
अशी बातमी दिली तर त्यांचे कान टवकारतील,त्यांचे ट्युबलाईट लागतील.तरच बातमीवर आणि पत्रकार यशस्वी झाले म्हणायचे.आणि आम्ही सुद्धा.
गोद्रीच्या शेतकऱ्यांना महाजन यांनी नुकसानभरपाई दिली पाहिजे,ही बातमी न देता,महाजन शिवजयंती ला नाचले.ही फोटो सहित बातमी दिली.
बातमीदार, पत्रकार खूप मेहनत घेतात.त्यांना पगार परवडत नाही तरीसुद्धा घेतात.पायी फिरतात.किंवा लिफ्ट मागून फिरतात. त्यांना वसुली चे टार्गेट असते.ते पुरे करण्यासाठी चोर नेत्यांकडे लहान तोंड ठेवावे लागते.ज्या पुढाऱ्याला बायको पाणी पाजत नाही त्याला भाऊ दादा मामा म्हणावे लागते.ही माणसे बाहेर हॉटेलमध्ये,ट्रेनमधे लफडे करतात.एकमेकांची सीडी सीडी सांगून ब्लॅकमेल सुद्धा करतात.अशा लोकांचे नेहमीच फोटो पेपरला छापून येतात.पण एखादा फोटो मुंबई नाशीकच्या हॉटेल मधील किंवा ट्रैनमधील सुद्धा छापला पाहिजे.तरच या चोर,चावट नेत्यांवर बातमीदार व पत्रकारांचा वचक बसेल.तेंव्हा, टार्गेट पुर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन मागावे लागणार नाही.तेच येतील तुमच्या कडे.सांगतील,ये भो,ते फोटो पेपरला छापू नको.ही घे माझ्या वाढदिवसाची जाहिरात.तेंव्हा तुम्ही बातमीदार व पत्रकारांचा रूबाब वाढेल.फक्त त्यांचा वाढदिवस नव्हे,बायकोचा, पत्नी चा,सालीचा, मैत्रीणीचा सुद्धा.
मी नेहमीच सांगतो.आम्ही आमदार खासदार मंत्री यांच्या मागील कुरणाला काडी लावतो.तुम्ही आगडोंब ,भीषण आग लागली,असे छापले तर हेच चोर आणि चावट आमदार खासदार मंत्री तुम्हाला विनंती करतील कि ,पाणी टाका रे आगीवर!तेंव्हा तुमच्याकडे पाणीचा बंब नसला तरी पान खाऊन पिचकारी मारा.लाल लाल झाली पाहिजे.लोकांना दिसली पाहिजे.तेंव्हा ते चोर आणि चावट आमदार खासदार मंत्री म्हणतील,अरे भो,पेपरच्या पानाने झाक रे ! जसे दादा कोंडकेंनी एका सिनेमात केळीच्या पानाने मागील कुरण झाकले होते.बकऱ्या मागे लागल्या होत्या.जमेल तुम्हाला.करून तर पहा!
मी अनेक पेपर वाचतो.त्यातील मजकूर डॉक्टर वकील प्रोफेसर इंजिनिअर साहित्यिक व्यापारी वाचत नाहीत.तो मजकूर त्यांच्या पात्रतेचा नसतो.म्हणून ते पेपर खरेदी करीत नाहीत.ते पेपर घेतात फक्त त्यांचे पेशंट,अश्लील, विद्यार्थी,क्लायंट यांचे साठी.त्या निमीत्ताने तरी तो येथे थांबून राहिल.घाई करणार नाही.म्हणून पेपरचा खप कमी झाला आहे.
पेपरमधील आधिकतम मजकूर रोचक,चावट,वात्रट असतो.जसे बायको पळाली माहेरी.याने तिचा हात धरला.प्रेमप्रकरणातून खून.प्रेमी यूगलाची आत्महत्या.खड्डयांमधे अगरबत्ती लावली,नावा सोडल्या,पुजा केली.मंत्रीने धरला ठेका.पोलिस दारू पिऊन तर्र.हेल्मेट न घातल्याने दंड.ही बातमी फक्त रिकामचोट लोक वाचतात.जे रात्री बस स्टॉपवर झोपतात.दिवसा घरी जाऊन खोकलतात.सकाळी रस्त्यावर नाश्ता करतात.संध्याकाळी टाकून जिभेने ओठ पुसतात.ते लोक पेपर खरेदी करीत नाहीत.ते बहुधा पेपर वाचण्यासाठी एक दोन किमी पायी पायी वाचनालय, दवाखाना , मंदिरात किंवा वकील कडे जाऊन बसतात.असे लोक पेपर खरेदी करीत नाहीत.
सारांश,जो पेपर खरेदी करू शकतो, त्यांच्यासाठी पेपरमधे काहीच नसते.आणि ज्याच्यासाठी पेपरमधे असते तो खरेदी करू शकत नाही.म्हणून पेपर चा खप कमी झाला आहे.अमळनेर, जळगाव नव्हे मुंबई पुणे येथील उच्चशिक्षित श्रीमंत लोक पेपर घेण्यासाठी एक एक किमी पायी चालत जात असत.आता ते आकर्षण पेपरचे राहिले नाही.
बाई तू चाल पुढे,रंग माझा भलताच वेगळा,तेंव्हा होती तशी तू राहिली नाही अशा सिरीयल जास्त तापदायक झाल्याने अनेक घरातील टिव्ही रिचार्ज करणे बंद पडले आहे.त्यापेक्षा हवा घरात आली तर येऊ द्या, पडळकर,राऊत ,शिंदे,राज,राणे यांचे लाईव्ह शो पाहाणे पसंद करतात.क्रिकेटमुळे तर अनेक लोक पार वेडे झालेत.इतिहास वर विश्वास उरला नाही.सकाळी बातमी देतात,भारताचा दणदणीत विजय.संध्याकाळी तोच बातमीदार म्हणतो,भारताचा धुव्वा उडवला.मला संशय येतो,मी घेतली कि त्याने टाकली?अनेकांचे या पझल मधे डोके भणकावून हातातील रिमोट ला बॉल समजून टिव्ही वर मारून फेकला.तेंव्हा घरात शांतता नांदू लागली.मोदींचे टिव्ही वर येऊन डावा हात वर करून,ताठ तर्जनी करून धमकावणे पाहून पाहून सज्जन व गरीब लोक घाबरले.टिव्हीच्या मागील वायरी तोडून हटकून नादुरुस्त केला.ना चलेगा टिव्ही,ना दिखेगा मोदी,नहीं मिलेगी धमकी.
.. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव