गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या





भंडारा : एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मान सागर सोनटक्के, रा. कस्तुरबा गांधी वॉर्ड, भंडारा असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याने स्वतःच्या घरी स्वयंपाकखोलीत घराच्या आड्याला नारंगी दुप्पट्याने गळफास घेतला. भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार काटेखाये करीत आहेत.