चिखलदरा :- पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी वृत्त संकलन केल्यानंतर राहत्या घरी आरोपींनी हल्ला चढविला. या घटनेतील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली होती.मंगळवार(ता.१४) रोजी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करन्यात आला. या घटनेचा मुद्दा सभागृहात माजी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.
पत्रकार संरक्षण कायद्या नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सोबतच आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केल्याने त्यांचे देखील संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
तिवसा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर तिवसा शहरातील काही गावगुंडांच्या कुटुंबियांकडून सोमवारी सकाळी राहत्या घरी जीवघेणा हल्ला चढविला. यावेळी घरी कुटुंबासमवेत असलेल्या प्रशिक मकेश्वर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र असंतोषाची लाट उसळली आहे. अनेक पत्रकार बांधव, संघटना निषेध व्यक्त करीत आहे. पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आरोपींवर तत्काळ अटक करावी, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर तिवसा मतदार संघातील विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मंगळवारी रोजी सभागृहात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. पत्रकार कायद्या नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने स्वागत करण्यात आले. तसेच पत्रकार प्रशिक मकेश्वरवर खोटा गुन्हा दाखल केला असून तो रद्द करावा, या मागणीला घेऊन पत्रकार संघाचा वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा अधीक्षक( ग्रामीण) कार्यालय येथे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष, महानगर प्रमुख, शहराध्यक्ष यांच्या नेतृवात करण्यात येणार आहे.
विभागीय अध्यक्ष नयन मोंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, कार्याध्यक्ष देविदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष अली अजगर दवावाला, महासचिव शोहेब खान, जिल्हा संघटन मोहित भोजवानी, महानगर प्रमुख अनिरुद्ध उगले, शहराध्यक्ष अजय श्रुंगारे, उपाध्यक्ष दिलीप जवंजाळ, वरिष्ठ पत्रकार संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, नितेश राऊत, अमोल देशमुख, प्रणव निर्बाण, अमर घटारे, सुरज दहाट, स्वप्नील उमप, सुधीर भारती, भैय्या आवारे, अशोक जोशी, अमोल खोडे, सुधीर गणवीर, छगन जाधव, प्रसिद्धी प्रमुख सागर तायडे, राजरत्न मोटघरे, जिल्हा महिला अध्यक्ष मीनाक्षी कोल्हे, महिला शहर सुरुची बनगैय्या, समीर अहमद, शफीक अहमद, सतीश वानखडे, सागर डोंगरे, स्वप्नील सवाळे, वैभव अवटीक, गजानन खोपे, अक्षय पुंडेकर, युवराज उमरीकर, नासिर हुसेन, अनिकेत दहातोंडे, संदीप शेंडे आदींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.