प्रेम प्रकरणातून दोघांनीही घेतले विष


घुग्घुस (चंद्रपूर) : वेगवेगळ्या घटनास्थळी दोघांनीही विष प्राशन केले. यात तरुणीचा मृत्यू झाला तरं उपचारा दरम्यान तरुणही दगावला. ही घटना जिल्हातील घुग्घुस (Ghugus) येथे घडली. शुभांगी भोंगळे ( 24 ), राकेश जेणेकर ( 27 ) अशी मृतकांची नावे आहेत. या दोघांनी टोकाचा निर्णय का घेतला? याची माहिती अद्याप पुढे आली नाही.

जिल्ह्यातील तरुण-तरुणीने विष प्राशन करून जीवन संपवले. वेगवेगळ्या घटनास्थळी त्यांनी विष प्राशन केले. मात्र या दोघांचे नाते समोर आले अन सारेच हळहळले. जिल्हातील घुग्घुस येथील रामनगर कामगार वसाहत येथील शुभांगी भोंगळे (24) आणि गांधीनगरमधील राकेश जेणेकर (27) असे या तरुण, तरुणीचे नाव. हे दोघे प्रेमी युगल असल्याचे बोलले जात आहे.

या दोघांनी बुधवारी वेगवेगळ्या घटनास्थळी विष प्राशन केले. विष प्राशन केल्याची माहिती मिळताच दोघांना दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हळविण्यात आले. चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान शुभांगी हिचा बुधवारी मृत्यू झाला. राकेश याला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Crime)

मात्र गुरुवारी सायंकाळी उपचतारादरम्यान त्याने शेवटचा श्वास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. प्रेम प्रकरणातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत घुग्घुस ठाणेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरु असल्याचे सांगितले. Chandrapur