वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी


सावली:
मागील काळात वाघाच्या दहशतीत अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, याची गंभीर दखल घेत वनविभागाने वन्यजीवांवर नियंत्रण आणण्याचा काहीसा प्रयत्न केला त्यात एका वाघाला सुध्दा जेरबंद करन्यात आले त्यामुळे वन्यजीवांचे हल्ले कमी होतील अशी अपेक्षा तालुका वासियांची होती मात्र वर्ष बदलल्यानंतर ही वन्यजीवांचे हल्ले सातत्याने सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे,नुकतेच सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत उपवन क्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत वाघोली बुट्टी येथील राजु भिकाजी गव्हारे ४० वर्ष रा .वाघोली बुट्टी येथील शेतकरी वाघाच्या हलल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली


आपल्या शेतातील चार एकर मध्ये लावलेल्या मक्का पिकांची पाहणी करीत असताना ,मक्ता पिकांवर.रांनटी उपद्रवी वन्यजीव डुक्कराचा हौदोस सुरू होता, त्यामुळे फटाके फोडून डुकराना पळवून लावण्यासाठी सदर जखमी शेतकऱ्यांने शेतात फटाक्यांची आतिषबाजी केली परिणामी शेता लगत दब्बा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला केला फटाला फुटला नसता तर कदाचित शेतक ऱ्याला आपला जीव सुधा गमविन्याची वेळ निर्माण झाली असती परिणामी फटाक्याच्या आवाजाने वाघाने घाटनास्थळा वरुण पळ काढला मात्र हल्यात शेतकरी जखमी झाला घटनेची माहिती होताच वन कर्मचारी घटनास्थळी धाउन गेले ,जखमी शेतकऱ्याला तात्काळ सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारार्थ भरती करण्यात आले,
सदर वन्यजीवाच्या हलल्यावरुन आजही वन्यजीवांचे मोठे हल्ले तालुका परिसरात सुरू असून कधी वाघ गावात येणे ,कोंबड्या, बकरी नेणे ,तर कधी शेतकऱ्याला.जखमी करणे असा मोठा प्रकार सुरू असल्याने वाघाची मोठी दहशत तालुक्यात सुरू आहे त्यामुळे वन्यजीवाच्या हलल्याने भितीचे मोठे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीवांवर त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी तालुका वासियांकडून केली जात आहे ……