पुतण्या काकीच्या अनैतिक संबंधाचा करणार होता खुलासा, काकीने केलं असं धक्कादायक कृत्य


आपल्या अनैतिक संबंधाचा खुलासा होऊ नये म्हणून एका काकीने आपल्या पुतण्याची हत्या केली. ही घटना समोर आल्यावर सगळ्यांना धक्का बसला. प्रत्येक रात्री 14 वर्षीय सचिन आपल्या काकीला रोहितच्या मिठीत बघत होती. याला वैतागून सचिनने ठरवलं की, तो हे सगळं दुसऱ्या गावात राहणाऱ्या काकांना सांगणार. यासाठी तो पुरावे गोळा करत होता.


दरम्यान एक दिवस त्याने काकी आणि तिच्या प्रियकराचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. पण काकांना पाठवण्याआधी हा व्हिडीओ त्याने काकीला दाखवला आणि म्हणाला की, वेळीच सुधार नाही तर व्हिडीओ काकांना पाठवणार. पण झालं उलटं. सचिनचा शीर धडापासून वेगळं असलेला मृतदेह गावातील आमराईत सापडला.

जोरजा गावात 23 फेब्रुवारीला बेपत्ता झालेल्या सचिनची हत्या त्याची काकी आणि तिच्या शेजाऱ्याच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून करण्यात आली होती. याचा खुलासा पोलिसांनी दोघांनाही अटक केल्यानंतर केला. 

पोलिसांनी घटनेच्या 48 तासांनंतर हत्येसाठी वापरलेले हत्यार आणि मोबाइल जप्त केले. सोबतच दोन्ही आरोपींना अटक केली. मोबाइलमधून या घटनेचा खुलासा झाला.

गुरूवारी बेपत्ता झालेल्या सचिन यादवचा मृतदेह एका आमराईत आढळून आला होता. सचिनची हत्या धारदार हत्याराने करण्यात आली होती. सचिनची काकी आणि तिचा शेजारी यांच्यात एक वर्षापासून अनैतिक संबंध सुरू होते. त्यांचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याचं सचिन बोलला होता. याच कारणाने सचिनची हत्या करण्यात आली. 

मृत सचिनची आई सविता देवीने सांगितलं की, सचिन आपल्या काकीचं वागणं बघत होता. त्याला रागही येत होता. मी यात काही बोलत नव्हते. पण त्याने चुकीच्या गोष्टीचा विरोध केला. याच कारणाने त्याची हत्या केली गेली. दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.