गडचिरोली : सूरजागड पाठोपाठ कोणसरी (ता. चामोर्शी) येथे लोह उत्खनन प्रकल्प सुरू होत आहे. येत्या महिनाभरात प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात होईल, अशी माहिती आहे.
सूरजागड येथे १००३ पासून लोहखनिज उत्खनन केले जाते. २०२१ ते २३ या तीन वर्षांत ५७ लाख ५९ हजार ५२८ टन इतके लोह खनिज उत्खनन केलेले आहे. या खाणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जात आहे. ३२०९ लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
पाठोपाठ कोणसरी प्रकल्प एप्रिल- मे महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड हजार लोकांना रोजगार होऊ शकतो. या ठिकाणी सुरू असलेल्या खाणीमध्ये ५० टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून रोजगार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.