गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यातील ७ कि.मी. अंतरावरील मुड्झा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिंपळाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मुडझा येथील मधुकर सिताराम सोनुले वय ६ 2 वर्ष यांनी दि . ७ मार्च दुपारी १ वाजता रंगपंचमीच्या दिवशी तो आपल्या शैतात गेला व आत्महत्या केली . सनाचा दिवश असल्यामुळे दिवशभर शेताकडे कुणीही गेले नाही. घरच्या लोकांना वाटते की रंगपंचमी असल्यामुळे तो गावातच असले परंतु तो शेतामधे जावून आपली जिवन यात्रा संपविली.
शोधाशोध केल्यानंतर शेतामध्ये सदर प्रकार उघडकीस आला. कर्तव्यदक्ष पोलिस पाटिल मेश्राम मॅडम हिने लगेच गडचिरोली पोलिस स्टेशनला माहिती दिली असता , गडचिरोली पोलिस स्टेशनचे मुडझा बिट चे जमादार म्हरसकोल्हे घटना गाठू नपंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. पोलीसाचे अधिक तपास सुरु असुन . मधुकर याला ४ एकर शेती होती दोन वर्षाचा नापिकीमुळे कर्जाच्या बोजापाही मधुकर ने आत्महत्या केली असी गावात चर्चा होती. मधुकर यांचे मागे पत्नी ' एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचा अकस्मीत निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.