कुत्रा चावल्याने शिवरामचा मृत्यू

गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील घोटी येथील देवराम भरतराम कोरे (५०) यांना पंधरा दिवसांपूर्वी गावठी कुत्रा चावल्यामुळे त्यांच्यावर डव्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले; परंतु अचानक २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथून गोंदिया येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.