गडचिरोली जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के


गडचिरोली: तेलंगणा - महाराष्ट्र सीमावर्ती भागात आज भूकंपाचे धक्के जानविले.भूकंपाची तीव्रता 3.1 होती. भूकंपाचे केंद्र तेलंगणा राज्यातील कागजनगर जवळील दहेगाव होते. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव परिरासरतील काही भागात भूकंपाचे धक्के आज जाणवले. या भूकंपाची नोंद नागपूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली आहे. जीवित वा कुठलीही वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.