चंद्रपूर :- गोंडपीपरी तालुक्यातील मध्य चंदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या सुकवाशी डोंगरगाव जंगलात वाघीण व वाघाच्या बछड्याचे कुजलेल्या अवस्थेत शव आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. carcasses of the tigress and the calf were found या घटनेने वन विभागात खळबळ माजली.
सदर घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक 163 व 161 मध्ये शुक्रवारी 24 मार्च रोजी घडली.
शुक्रवारला आधी बछडाच्या मृतदेह कक्ष क्रमांक 161 मध्ये
आढळून आला होता त्यानंतर वन विभागाने शोध मोहीम राबविली असता कक्ष क्रमांक 163 मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत Decomposing body of a tiger आढळला होता.
वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पंचनामा करून वन अधिकाऱ्यांनी दोन्ही वाघाना अग्नी दिला आहे. Forest
वाघ आणि बछड्याचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या वाघिणीला पुन्हा काही बछडे होते काय ? याचा शोध वनविभाग घेत आहे.
गोजोली सुकवाची वनपरिक्षेत्रात प्रवाह सोडलेल्या ताराने वन्य जीवांची शिकार केली जाते. या परिसरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वाघांच्याही मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघीण आणि बछडाच्या मृत्यू नैसर्गिक आहे की शिकार ? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Natural death or poaching ?
जिल्ह्यात वाघांचे मृतदेह आढळल्याच्या घटना वाढत असतांना सदर घटनेत वनविभागाचा तपास नैसर्गिक मृत्यू की शिकार ? या अनुषंगाने सुरू आहे