मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची जेलमध्ये रवानगी
ब्रम्हपुरी:-
घटनेतील आरोपी नामे एजाज रसुल शेख वय २० वर्ष , राह. नान्होरी असे आहे.
यातील आरोपी याने फिर्यादी राह.धामणगाव हिच्या गावी दिनांक २९/३/२०२३ रोजी जावून फिर्यादीचा हाथ पकडुन केस ओढले व तिच्या गालावर थापडा मारल्याने आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी अप.क्रमांक १३९/२०२३ अन्वये भांदवी कलम ३५४, ३५४(अ),३२३ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
अटकेतील आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस.डी.चक्कर साहेब यांनी आरोपीची तुरुंगात रवानगी केली.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर लाकडे करीत आहेत. मुलीची