मराठी जोक्स.....


नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.

आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल
😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!
...
१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!

गोलू: २० लाख...!!!
😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣

आई: बाळ तू खूप मोठा हो...

बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.