विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
भद्रावती : देवरवारा- माजरी रस्त्यावरील शेतात गेलेल्याशेतकऱ्याचा जंगली
पाणी देण्यासाठी प्राण्यांसाठी लावलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने, जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. मधुकर महादेव आसुटकर (४०) रा. देऊरवाडा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

देऊळवाडा-माजरी रस्त्यावर मधुकर आसुटकर यांची शेती आहे. त्याने आपल्या शेतीला लागून असलेली राजूरकर यांची शेती ठेका पद्धतीने केली. तिथे सोयाबीन पिकाची दुबार पेरणी केली. त्या पिकाला पाणी देण्यासाठी ते नेहमीच पहाटे जात होता. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतात जिवंत विद्युत प्रवाहाचे तार लावून ठेवत होता. घटनेच्या दिवशी पहाटे वीज प्रवाह बंद करण्याचा त्याला विसर पडला. दरम्यान, तारांना स्पर्श झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची पत्नी शेताकडे गेली असता, हा प्रकार उघडकीस आला.