उन्हाळी धानावर खोडकिड्यांचा प्रादुर्भाव

गडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या उन्हाळी धानावर सध्या खोडकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी विविध प्रकारच्या उपाययोजना करीत आहेत. खोडकिड्यांमुळे धानपीक बुडातूनच पोखरले जात आहे. परिणामी पीक पिवळसर पडून ते निरुपयोगी ठरते. सध्या उन्हाळी धानपीक जोमात आहे. १५ दिवसानंतर धान निसवण्यास सुरुवात होईल. अशास्थितीत खोडकिड्यांवर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा उशीर झाल्यास बहुतांश पीक नष्ट होईल. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.