दोन दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी


चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील विठलवाडा - आष्टी मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन घटनास्थळीच दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सोमवारी (27 मार्च) ला दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. राकेश जधुनाथ अधिकारी (वय 30) ठाकुरणगर ता. चामोर्शी व अमोल नैताम मु. बेलगटा चारगाव ता. सावली (वय 27) असे मृत्तांचे नाव आहे.

गोंडपीपरी तालुक्यातील विठलवाडा - आष्टी मार्गावरून एम एच 40 बि. यू. 9878 व एम. एच. 34 सी. बी. 5972 क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही आष्टी व गोंडपिपरी अशा विरुद्ध दिशेने भरधाव जात होते. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन दोघांचीही एकमेकांना दुचाकींना जबर धडक बसली. अपघात ऐवढा भिषण होता की घटनास्थळीच राकेश जधुनाथ अधिकारी ठाकुरणगर ता. चामोर्शी, अमोल नैताम मु. बेलगटा चारगाव ता. सावली) या दोघांचा मृत्यू झाला. नितेश दामोदर कोवे (वय 27) मु. चारगाव ता. सावली हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळतात ठाणेदार जीवन राजगुरू, प्रशांत नैताम, गणेश पोदाळी यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. तर गंभीर जखमी युवकाला गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले आहे