गडचिरोली, भारत सरकारने वाढविलेले घरगुती गॅस सिलेंडरचे भाव त्वरीत कमी करून देशातील महिला व नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे.
महिला आघाडीच्या एका शिष्टमंडळाने आज दुपारी उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन पंतप्रधानाच्या नावे लिहीलेले निवेदन सादर केले.
घरगुती गॅस सिलेंडरचे भाव एकदम पन्नास रूपयांनी वाढविल्याने संपुर्ण महिलांचे बजेट पुर्णपणे कोसळले असुन दैनंदिन स्वयंपाक करणे कठिण झाले आहे व गॅस सिलेंडर घेण्याची बNयाच कुटुंबियांची आर्थिक क्षमता नसल्यामुळे इतर साधनांवर स्वयंपाक करणे महिलांना क्रमप्राप्त झाले आहे असे निवेदनात म्हंटले आहे.
पेट्रोल, डिझेल अन्नधान्याच्या विंâमती आधीच भरमसाठ वाढलेल्या असल्यामुळे व महागाई आकाशला भिडली असल्यामुळे महिला व नागरिक अतिशय त्रस्त आहेत. अशातच दैनंदिन वापराच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या विंâमती सुध्दा वाढविण्यात आल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी महिलांचे जगणे कठिण झाले असुन हा त्यांच्यावर प्रचंड आघात झालेला आहे. असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
महिलांची ही समस्या लक्षात घेऊन सरकारने गॅस सिलेंडरची भाव वाढ त्वरीत कमी करावी व स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे.
या शिष्टमंडळात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, तालुका अध्यक्ष तेजस्वीनी रामटेके, शहर उपाध्यक्ष ज्योती चौधरी, शहर सचिव पुनम भैसारे, तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, तालुका उपाध्यक्ष विजय देवतळे व अन्य कार्यकत्र्यांचा सहभाग होता.