मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही झटपट होत आहेत. कालपर्यंत ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या, त्या आता एका क्लिकवर होत आहेत. पण असं असलं तरी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट स्पीडही तितकाच महत्त्वाचा आहे. भारतात 4 जी नंतर आता 5 जीचं जाळं विणलं जात आहे. मात्र तत्पूर्वीच भारतात 6जी नेटवर्कची तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी भारतात 6 जी विजन डॉक्युमेंट सादर करण्यात आलं. त्याचबरोबर 6जी रिसर्च आणि डेव्हलपमेंट टेस्ट बेडही लाँच केलं आहे.
6जी विजन डॉक्युमेंट सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, “तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे भारताचं दशक आहे. भारताचं टेलिकॉम आणि डिजिटल मॉडेल सुरक्षित आणि पारदर्शक आहे.” भारताचं 6 जी विजन डॉक्युमेंट 6जी (टीआयजी-6जी) टेक्नोलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केला आहे. या ग्रुपची स्थापना नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती.
भारतात प्रत्येक महिन्याला 800 कोटी रुपयांची देवाणघेवाण युपीआयच्या माध्यमातून होते. प्रत्येक दिवशी 7 कोटी ई- अथॉन्टिकेशन होत आहे. 28 लाख कोटी रुपये थेट बेनफिट ट्रान्सफरच्या मदतीने नागरिकांच्या खात्यात पाठवले जात आहेत. 5 जी सेवा सुरु केल्यानंतर 6 जी सेवेची आपण चर्चा करत आहोत. हे भारताचं भविष्य सांगत आहे.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
6 G plan : भारत जगातील दूरसंचार तंत्रज्ञानाचा प्रमुख निर्यातदार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ५ जी च्या सामर्थ्याने भारत संपूर्ण जगाची कार्यसंस्कृती बदलण्यासाठी अनेक देशांसोबत काम करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या भारतातील नवीन क्षेत्रीय कार्यालय आणि नवोपक्रम केंद्राच्या उद्घाटनावेळी बोलत होते. कार्यक्रमादरम्यान ६ जी चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. यासोबतच देशात लवकरच ६ जी सेवाही सुरू होणार आहे.
पंतप्रधान म्हणाले की दूरसंचार तंत्रज्ञान हा केवळ शक्ती दाखवण्याचा मार्ग नाही तर ते लोकांना सक्षम बनवण्याचे एक ध्येय आहे. भारतातील १२५ शहरांमध्ये ५ जी कनेक्शन सुरू झाले आहेत.
'४जी पूर्वी भारत फक्त दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापरकर्ता होता, परंतु आता भारत दूरसंचार तंत्रज्ञानाचा मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.' मोदींनी असेही जाहीर केले की, येत्या काही दिवसांत भारत १०० नवीन ५ जी तंत्रज्ञान प्रयोगशाळा स्थापन करणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आजचा दिवस खूप खास आहे, खूप पवित्र आहे. हिंदू कॅलेंडरचे नवीन वर्ष आजपासून सुरू झाले आहे. मी तुम्हाला आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत 2080 च्या शुभेच्छा देतो.
मला आनंद आहे की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, टेलिकॉम आयसीटी आणि संबंधित नवकल्पनांच्या संदर्भात भारतात मोठी सुरुवात केली जात आहे.
यासोबतच भारताकडे असलेली दोन प्रमुख ताकद म्हणजे ट्रस्ट आणि स्केल. या दोघांशिवाय आपण तंत्रज्ञान प्रत्येक कानाकोपऱ्यात नेऊ शकत नाही. आज संपूर्ण जग भारताच्या या दिशेने केलेल्या प्रयत्नांची चर्चा करत आहे.
गेल्या काही वर्षांत, भारताने DBT द्वारे भारतीयांच्या खात्यात ₹ 28 लाख कोटींहून अधिक रक्कम पाठवली आहे. जन धन योजनेद्वारे, आम्ही अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त बँक खाती उघडली आहेत. आधारद्वारे त्यांचे प्रमाणीकरण केले आणि नंतर 100 कोटींहून अधिक लोकांना मोबाईलद्वारे जोडले.