विरांगणा राणी दुर्गावती थोर पराक्रमी होत्या त्यांनी आदिवासीच्या उत्थानासाठी महान कार्य केले. राजेश इरपाते


गडचिरोली _ विरांगणा राणी दुर्गावती ह्या थोर पराक्रमी होत्या त्यांनी आदिवासीच्या उत्थानासाठी महान कार्य केले म्हणुनच आज पिपंरटोला या छोट्याश्या गावातही त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. राणी दुर्गावती चा आदर्श समाजातील प्रत्येक घटकांनी घ्यावा यातच आदिवासी बांधवांचे हित आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन राजेश ईरपाते, युवा नेता गोगवाना गणतंत्र पार्टी नागपूर यांनी पिपरटोला येथील विरांगणा राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी केले. 





 विरागंणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा व गोडीधर्म सम्मेलन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम गोटुल भुमी पि पंरटोला (नरचुली ) येथे संपन्न झाला. सुमित्रा उईके यांचे हस्ते ध्वजारोहन पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन, गोंगपाचेजेष्ठ नेते दिवाकर पेंदाम. सुधाकर आत्राम वामन कुमरे , राजेश इरपाते , विश्वेश्वर दर्रा ' नंदकिशो नैताम , योगेश नरोटे , देवराव मडावी, सरपंच संदिप वरखडे , प्रशांत मडावी युवा नेता गोंगपा राकेश नैताम , मोहन तुलावी , धनराज मडावी ' मुरलीधर सडमाके , सुमित्रा उईके , प्रतिभा मडावी , हसिना उसेंडी , निर्मला पेंदाम ' आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचे विधिवत अनावरण करण्यात आले. याप्रसंगी राजेश इरपाते यांनी गोंडी धर्म हा मुलनिवासी आहे. त्याचे जतन केले पाहीजे तसेच दिवाकर पेंदाम यांनी सांगीतले की , आम्ही मुलनिवासी आहोत जल. जंगल , जमीन आमची आहे. तमाम आदिवासींनी त्याचा फायदा घ्यावा तसेच आदिवासी बांधवानी आपल्या एकजुटीची ताकत दाखवावी. रात्रौ रेला नृत्य पार पडले. कार्यक्रमास पिपंरटोला परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.