मार्च महिन्याच्या अखेर दिवशी वैरागड येथे सर्पमीत्राने दिले मांजऱ्या सापाला जीवनदान.

मार्च महिन्याच्या अखेर दिवशी वैरागड येथे सर्पमीत्राने दिले मांजऱ्या सापाला जीवनदान.

- बाथरूमच्या छतावर होता मांजऱ्या साप.
- वन्यजीवांना संरक्षण देऊन जीवनदान द्या वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी पदाधिकाऱ्यांचे आवाहन.

दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी




वैरागड : - मार्च महिन्याच्या अखेर दिवशी वैरागड येथील रवी महागु दुमाने यांच्या घरी निघालेल्या ०४::३० (साडेचार फूट) लांबीच्या मांजऱ्या जातीच्या निम विषारी सापाला सर्पमीत्र प्रलय सहारे यांनी सुरक्षित पकडून जीवनदान दिले. 

दि. ३१ मार्च रोजी दुपारी मोबाईलवर रवी दुमाने यांनी सर्पमित्र प्रलय सहारे यांना घरी साप असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र प्रलय सहारे तत्काळ सोबत प्रवज्जा प्रलय सहारे हिला सोबत घेऊन दुमाने यांचे घर गाठले. तिथे पाहणी केल्या नंतर त्यांच्या बाथरूमच्या छतावर साप असल्याचे आढळले घरच्या परिवाराला धीर देऊन त्या सापाला सुरक्षित पकडून डब्यात ठेवण्यात आले. सर्पमित्रांनी साप पकडताच परिवाराने सुटकेचा निःश्वास सोडला आणि सर्पमीत्राचे आभार मानले. त्यानंतर सर्पमित्राने वनविभागाला माहिती देऊन सापाला वन अधिवासात सोडण्यात आले.


आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थे मार्फत साप, पशू, पक्षी आणि वन्य जीवांना संरक्षण देऊन जीवनदान दिल्या जाते. वन्यजीव आपला एक घटक असून त्यांना जीवनदान द्या असे आवाहन वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी अध्यक्ष देवानंद दुमाने, सचिव दिपक सोनकुसरे आणि पदाधिकारी यांनी यावेळी केले आहे.