तरूणीने मनुस्मृती जाळून ढोंगी आणि पाखंडी ब्राम्हणी विचारांवर केला हल्ला बिहारमधील तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल



पटना : बिहार येथील एका तरूणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती मनुस्मृती जाळून त्यावर सिगारेट पेटवताना दिसत असून नंतर तीच मनुस्मृती चुलीत घालून तिच्यावर चिकन शिजवताना दिसत आहे. या व्हिडिओला अनेकांकडून शेअर केलं जात असून यामुळे ट्विटरवर मनुस्मृती हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.



दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओचे अनेकांनी समर्थन केले आहे तर या तरूणीने तथाकथित हिंदू (ब्राम्हणांच्या) भावना दुखावल्या असाही आरोप अनेकांनी केला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर या तरूणीने माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रिया दास असं या तरूणीचे नाव आहे.



व्हिडिओमध्ये प्रिया दास म्हणते, मनुस्मृती जाळणे हे केवळ प्रतिकात्मक आहे आणि ही एक जुनी घटना आहे, या विचाराचा पाया आणि उद्देश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पूर्वी रचला होता, मनुस्मृती जाळण्यामागे माझा हेतू एखाद्या व्यक्तीला दुखावण्याचा नाही तर माझा हेतू ढोंगी आणि पाखंडी विचारांवर हल्ला करणे असा आहे.