वैरागड : – गावात पाण्याची गंभीर समस्या जाणवत असताना येथील वॉर्ड नं. ०५ तसेच गावातील अनेक हातपंप १५ दिवसापासून बिघडीमुळे नादुरुस्त असल्याने गगरिकांना पाण्यासासाठी पायपीट करावी लागत आहे. नादुरुस्त हातपंप तत्काळ दुरुस्त करण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायत येथे घागर मोर्चा काढण्याचा इशारा आरमोरी पंचायत समिती माजी उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच येथील नदि-नाले कोरडे पडले आहे. एक ते दोन दिवसा नंतर गावात नळाद्रारे पिण्याचे पाणी नागरिकांना देण्यात येत आहे. अशातच १५ दिवसापासून गावातील हातपंप बिघाडिमुळे नादुरुस्त झालेले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अडचणीचा सामना करून इतरत्र भटकावे लागत आहे. अनेकदा स्थानिक प्रशासनाला सूचना करून कानाडोळा केला जात आहे. नागरिकांच्या पाण्याची समस्या पाहता तत्काळ हातपंप दुरुस्त करण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आरमोरी पंचायत समिती माजी उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.