दिनांक 08/03/2023 रोजी पोलीस स्टेशन केशोरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान म्हणून पोलीस स्टेशन केशोरी येथील महिला अंमलदार पो.हवा.पुनम हरिणखेडे यांना प्रभारी ठाणेदार पदाचा तात्पुरता कार्यभार देऊन तसेच सर्व महिला अंमलदार यांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री अशोक बनकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केशोरीचे प्रभारी ठाणेदार श्री. सपोनि शेख, पोलीस हवालदार सुशिल रामटेके, नैताम, पोलीस अंमलदार संतोष पुराम केशोरी पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी पार पाडले.