पोलीस पाटलाच्या रक्षणाकरिता गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीस नायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा


गडचिरोली, 15 मार्च : पोलीस पाटलाच्या रक्षणाकरिता गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी कलम 324 भादवी 2 वर्ष 8 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

राजेशाम बालमल्लु दुर्गम (40) रा. जाफ्राबाद ता. सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, 30 जून 2020 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान मोकेला गावचे पोलीस पाटील हे आरोपीस पोलीस स्टेशन बामणी येथे हजर राहण्याबाबत सांगण्याकरीता गेले असता आरोपीने गळ्यावर कुऱ्हाड ठेवुन जिवानिशी ठार मारतो, माझा जीव धोक्यात असून माझा बचाव करा अशी माहिती बामणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना फोन व्दारे दिली असता. घटनास्थळी पोलीस पथक गेले. दरम्यान आरोपीने प्रभारी अधिकारी यांचे छातीवर डाव्या बाजुस कुऱ्हाडीने वार केला. तसेच पोलीस शिपायाच्या डोक्यात विळ्याने वार करून गंभीर जखमी केले व त्याच्या मदतीला गेलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला सुध्दा त्याने विळ्याने वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात उप पोस्टे बामणी अप.क्र. 07/2020 कलम 307, 353, 332, 333 भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला.

पोलीस यंत्रणेने कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात से.के.क्र. 71/2020 अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज 15 मार्च 2023 रोजी आरोपी राजेशाम बालमल्लु दुर्गम याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम 324 भादवी 2 वर्ष 8 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि / सुधीर महादेवराव घुले व पोउपनि उदय विष्णु पाटील उपपोस्टे बामणी यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.