नवी दिल्ली :- सध्या स्थितीत सगळीकडेच मोफत रॉशन दिले जात आहे. अशातच मोफत रॉशन मिळण्यासाठी अपात्र असणारेही लाभ घेत असल्याने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.यासाठी रॉशन कार्डधारकाने स्वत:च्या उत्पन्नातून १०० वर्गमीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर खरेदी केली असेल,त्याच्याकडे चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, शस्त्राचे लायसन्स, गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचे रॉशनकार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात जमा करावे लागणार आहे. वरील चार गोष्टींपैकी एका जरी गोष्टीत दोषी आढळल्यास रॉशन कार्डधारकाचे रॉशनकार्ड तर रद्द होईलच पण त्याच्यावर कारवाईही केली जाणार आहे.
नव्या सरकारी नियमानुसार जर रॉशन कार्डधारकाने स्वत:हून कार्ड रद्द वा जमा केले नाही तर चौकशीनंतर असे कार्ड रद्द केले जाणार आहे.तसेच अशा कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर जेव्हापासून रॉशन उचलल्या गेले असेल,तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाईही केली जाणार आहे.
खरे म्हणजे रॉशन दुकानांतून दिले जाणारे रॉशन आर्थिकदृष्ट्या दुर्बल,कमकुवत व सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. मात्र हल्ली ज्यांची आर्थिक बाजू भरभक्कम आहे, असेही शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शासनाची दिशाभूल करतांना दिसून येतात.त्यासाठी गोरगरिबांना लाभ व्हावा; या उद्देशाने शासनातर्फे सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे दिसून येते.