महिलेचा विनयभंग, एक वर्षाचा कारावास, चामोर्शी न्यायालयाने दिला निकाल





चामोर्शी : जंगलात गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला चामोर्शी न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नितीन अर्जुन कन्नाके (वय २८ वर्षे), रा. चौडमपल्ली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. महिलेने विनयभंग केल्याची फिर्याद पोलिस स्टेशन आष्टी येथे दिली. पोलिस स्टेशन आष्टी येथील महिला पोलिस निरीक्षक समू चौधरी यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र चामोर्शी न्यायालयात वर्ग केले. सदर प्रकरणात साक्षदार यांचे

पुरावे नोंदवून दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीने कलम ३५४, ३५४ (अ) भा.दं.वि. गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. चामोर्शी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चामोर्शी, श्री. एन. डी. मेश्राम यांनी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाची बाजू अॅड. डी. व्ही. दोनाडकर यांनी मांडली.