केंद्र सरकारने भ्रष्टाचार, टेरर फंडिंग आणि इतर अनेक कारणांसाठी नोटबंदीची योजना आखली होती. हा उद्देश सफल झाल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. आता केंद्र सरकार 1000 रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणण्याची तयारीत आहे.
📣 *नितीन गडकरी यांची मोठी घोषणा!*
तब्बल 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होणार असल्याची घोषणा यावेळी नितीन गडकरी यांनी केली.
👌 *सव्वाकिलो चांदीतून साकारली राम मंदिराची प्रतिकृती*
अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याची संकल्पना होती. त्यामुळे वर्ध्यात सव्वाकिलो चांदीतून अयोध्या येथे सुरु असलेल्या राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.