शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा होणारगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून प्रति हेक्टर १५ हजार रूपये दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. अखेर तीन महिन्यांनंतर या आश्वासनाची पूर्तता करीत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारपासून (दि. ३१) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा होण्यास प्रारंभ होणार आहे.