कुरखेडा: गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या




कुरखेडा तालुक्यातील - खरकाडा येथील हर्षदा महेश बन्सोड ( २३ ) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार १२ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान निदर्शनास आली.

प्राप्त माहितीनुसार, हर्षदा हिचे एका वर्षापुर्वीच महेश याच्यासोबत लग्न झाले होते. तिला मुले नाहीत. दरम्यान आज तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेसंदर्भात कुरखेडा पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस
निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गावंडे करीत आहेत. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.