साखरीटोला: सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील पांढऱ्या तलावावर मित्रांसह आंघोळीसाठी गेलेला एक १६ विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी (दि.६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. रजत देवचंद रहांगडाले (वय १६) असे तलावात बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रजत हा सोमवारी दुपारी त्याच्या तीन मित्रांसह कारुटोला येथील पांढऱ्या तलावात आंघोळ करण्यासाठी गेला होता, त्याचे तीन मित्र आंघोळ परत गेले. . पण रजत परत गेला नाही.
दरम्यान तलावाशेजारी बकऱ्या चराईसाठी नेलेल्या काही तरुणांना तलावाच्या काठावर कपडे व मोबाइल आढळला पण त्यांना आजूबाजूला कुणीच आढळले नाही. त्यामुळे त्यांनी गावात संपर्क साधून याची
माहितीगावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच सरपंच
उमराव बोहरे, भीमा बोहरे व गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. दरम्यान कपडे आणि मोबाइलवरून ते कपडे रजतचे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान स्थानिक मासेमारांच्या मदतीने तलावात रजतचा शोध घेणे सुरू होते. पण वृत्त लिहिस्तोवर रजतचा शोध लागला नाही
दरम्यान रजत हा कारुटोला येथे त्याचे आजोबा सूरज शरणागत यांच्याकडे लहानपणापासून राहत असून तो साखरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे.