आम्हाला सरकारचे जावई म्हणून लाखो रुपये पगार नको पण सुशिक्षित बेरोजगारांना ३० टक्के मानधनावर पात्रतेनुसार कामावर घ्या.


भंडारा : सरकारचे जावई समजले जाणारे कर्मचारी अधिकाऱ्यांना भरगच्च लाखो रुपये पगार आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांकडून एक मिशन जुनी पेन्शन असा नारा लावत जुन्या पेन्शनकरिता बेमुदत संपाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. त्यामुळे जनसामान्यांवर त्याचा परिणाम झाला. तेव्हा मायबाप सरकार, कर्मचाऱ्यांऐवजी सुशिक्षित बेरोजगारांना ३० टक्के मानधनावर पात्रतेनुसार कामावर घ्या. आमदार, खासदार यांची पेंशन बंद करून अनावश्यक भत्ते बंद करावे. अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार महेश शितोळे यांच्यामार्फत भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातीलजेवनाळा येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी सुशिक्षित बेरोजगार निनाद गोंदोळे, अभय भुते, प्रमोद भुते, दिनदयाल गिऱ्हेपुंजे, प्रणय बुरडे, किशोर राऊत, खेमराज गिऱ्हेपुंजे, राहुल गोंदोळे, देवेंद्र लांबकाने व इतर उपस्थित होते.