स्वार्थी लोक पुस्तकात काहीतरी टाकतात, जे चुकीचे ब्राम्हणी धर्मग्रंथांची पोलखोल होत असल्याने मोहन भागवतांचा कांगावानागपूर: स्वार्थी लोक पुस्तकात काहीतरी टाकतात, जे चुकीचे आहे. त्यामुळे पुस्तकांची समीक्षा होणे गरजेचे आहे असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी ब्राम्हणी धर्मग्रंथांची पोलखोल होत असल्याने कांगावा करण्याचा प्रयत्न केला आहे.


भागवत यांनी पुन्हा एकदा तथाकथित हिंदू धर्माबाबत अनेक बाबी सांगितल्या आहेत. गुरुवारी त्यांनी नागपुरातील ग्रंथ आणि परंपरांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत. हिंदू धर्म हा निवड शिकवणारा धर्म आहे, तो समतोल देणारा धर्म आहे. आमच्याकडे पूर्वी ग्रंथ नव्हते, ते मौखिक परंपरेने चालत होते. पुढे धर्मग्रंथांची सरमिसळ झाली आणि काही स्वार्थी लोकांनी शास्त्रात काहीतरी टाकले, जे चुकीचे आहे. त्या ग्रंथ आणि परंपरांच्या ज्ञानाचा पुन्हा एकदा आढावा घेणे आवश्यक आहे असा कांगावा भागवत यांनी केला.


आपला धर्म विज्ञानानुसार चालतो आणि विज्ञानाला तो धर्म मानवासाठी फायदेशीर असण्याची गरज आहे, त्यामुळे विज्ञानाला समोर आणणे आपल्या परंपरेत आहे. म्हणूनच हे विज्ञान समोर आणण्याची गरज आहे. मात्र आपला धर्म म्हणजे कुठला धर्म हे सांगायला भागवत यांनी टाळले आहे.परंतु हिंदू धर्माचे ढोल बडवताना ब्राम्हण धर्म त्यामागे लपलेला आहे हे मात्र ते सांगताना दिसत नाहीत. ब्राम्हणी धर्मात कधीपासून वैज्ञानिक दृष्टीकोन रूजला हा संशोधनाचा विषय आहे. ब्राम्हणी धर्म म्हणजे पाखंडपणाचा कळस आहे. त्यामुळे विज्ञानाच्या गप्पा मारणे भागवत यांना शोभते का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत.


आपल्या परंपरेत, प्रत्येक विषयात आपल्या पूर्वजांनी जगाच्या शोधात काहीतरी केले आहे. आपल्याकडे परंपरागत असलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येकाला किमान मूलभूत माहिती असली पाहिजे. शिक्षणपद्धती आणि लोकांमधील संवाद यातून हे साध्य होऊ शकते अशी फेकामफेक भागवत यांनी करण्याचा प्रयत्न केला..