अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आश्वासन


काल शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या राज्यव्यापी संप पुकारला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी यावेळी केली होती. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले की, "मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून २ दिवसात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अहवालासंबधी चर्चा करण्यात येणार आहे." असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कर्मचारी संपामुळे राज्यभरातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.