चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडियासह त्यांच्या सहकाऱ्यांवर विनयभंगा बरोबरच गंभीर गुन्हा दाखल


चिमूर: साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीची छेडछाड करणे,व त्यांना मारहाण करणारे प्रकरण आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडीया यांच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये पोलिस स्टेशन चिमूर येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       सत्तेच्या बळावर कायदा हातात घेवून बेकायदेशीर कृती व कृत्य करण्याचा अधिकार कुणालाच नाही.मग तो खासदार असो,आमदार असो,की मंत्री असोत.भारतीय संविधानाने सर्वांना कायदेशीर कर्तव्य पार पाडण्याचे अधिकार आणि हक्क बहाल केले आहेत.तद्वतच बेकायदा कृत्य व कृती करण्यास शक्त मनाई केली आहे.

         यामुळे बेकायदेशीरपणे कृती करण्यासाठी आमदार,खासदार मंत्री,यांनी सुध्दा कायदा हातात घेणे शक्य नाही.

साईनाथ बुटके यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्यावर चिमूर पोलिस ठाण्यात भांदवी १४३,१४७,१४९,४५२,३२३,३५४,२९४,कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अजून पर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

        लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार बंटी भांगडियांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारण्याची व छेडछाड करण्याची कृती व कृत्य करणे,बरोबर नसल्याच्या जनमानसात गंभीर स्वरूपाच्या चर्चा अंतर्गत भावना आहेत.