अर्थसंकल्पातून जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न क्षेत्रालाही मिळणार चालना


चंद्रपूर (Chandrapur) : राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी, महिला तसेच सर्व समाजघटकांच्या सर्वसामावेशक विकासावर आधारित आहे. विशेष म्हणजे कृषी क्षेत्राला बुस्टर डोज मिळाल्यामुळे या अर्थसंकल्पातून जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 17 हजार 200 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तर वनाखालील क्षेत्र 5 लक्ष 74 हजार 600 हेक्टर आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 13 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय असून सर्वसाधारण खरीप क्षेत्र 4 लक्ष 45 हजार 891 हेक्टर, सर्वसाधारण रब्बी क्षेत्र 72901 हेक्टर तर सर्वसाधारण उन्हाळी क्षेत्र 3948 हेक्टर आहे. यावर्षीच्या सर्वसाधारण खरीप हंगामात धानाची लागवड 1 लक्ष 94 हजार 290 हेक्टरवर (40.33 टक्के), कपाशी 1 लक्ष 77 हजार 385 हेक्टर (36.82 टक्के), सोयाबीन 65062 हेक्टर (13.51 टक्के), तूर 33128 हेक्टर (6.88 टक्के), ज्वारी 2224 हेक्टर (0.46 टक्के) तर इतर पिकांची लागवड 9672 हेक्टरवर (2.01 टक्के) झाली आहे. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.