जागतिक महिला दिनाच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील युवतीची चंद्रपुरात आत्महत्या


भंडारा: जिल्ह्यातील करांडला गावाची रहिवासी असलेली 20 वर्षीय गायत्री रामटेके ही युवती चंद्रपूर येथील घुटकाळा वॉर्डात करायची खोली घेऊन वास्तव्यास होती. चंद्रपूर येथे ती स्पर्धा परीक्षेची तयारी व प्रशिक्षण घेत होती मात्र जागतिक महिला दिनाच्या सकाळीच समाजमाध्यमावर हा माझा शेवटचा फोटो Good Bye असे लिहून गळफास घेल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठवले असुन आई वडील नसल्याने मी हतबल झाली आहे अशा आशयाची मृत्यूपूर्व चिठ्ठी आढळुन आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.